बंद

    शासन निर्णय

    शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र.महाम – 2024/प्र.क्र.82/महामंडळे, दि.04.03.2025

    राज्यातील इतर मागासवर्गीयांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत इतर मागासवर्गात समाविष्ट असणाऱ्या आगरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदरचे महामंडळ “आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी)” या नावाने संबोधले जाईल. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.